कोरोना काळात ‘हे’ पाच घटक वाढवतील रोगप्रतिकारक शक्ती!

सगळ्यासोबत कोरोनापासून बचावासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ‘रोगप्रतिकारक शक्ती’. रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी, याविषयी सगळेच संभ्रमात असतात.

काळी मिरी

रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी काळी मिरीदेखील फायदेशीर आहे. काळी मिरी एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे. ज्यामुळे सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. कफ प्रकृतीसाठी काळी मिरी खूप फायदेशीर मानली जाते (5 Immunity Booster Food During Corona Pandemic).

थंड शुध्द खोबरेल तेल

खोबरेल तेल रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात खूप मदत करते. शुध्द नैसर्गिक खोबरेल तेल अनेक व्याधींवर गुणकारी ठरते. नारळाच्या तेलात मोनोलोरीन असते, जे शरीरातील अपायकारक जीवाणू नष्ट करण्यास मदत करते. यासह वजन कमी करण्यासाठी देखील खोबरेल तेल खूप फायदेशीर

livetv


tv9 logo

TOP 9

TRENDING

null

कोरोना काळात ‘हे’ पाच घटक वाढवतील रोगप्रतिकारक शक्ती!

या सगळ्यासोबत कोरोनापासून बचावासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ‘रोगप्रतिकारक शक्ती’. रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी, याविषयी सगळेच संभ्रमात असतात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Publish Date – 5:33 pm, Wed, 23 September 20
Subscribe to Notifications

 Subscribe to Notifications

मुंबई : कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘रोगप्रतिकारक शक्ती’ हा सगळ्यात (5 Immunity Booster Food During Corona Pandemic) महत्त्वाचा घटक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नेमक्या कोणत्या पदार्थांचे सेवन करावे याबाबत शाकाहारी लोक नेहमी संभ्रमात असतात (5 Immunity Booster Food During Corona Pandemic).

सध्या कोरोना महामारीच्या काळात जो-तो आपल्या कुटुंबासह स्वतःची काळजी घेण्यात व्यस्त आहे. साफसफाईपासून ते सोशल डिस्टंसिंगपर्यंत सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. या सगळ्यासोबत कोरोनापासून बचावासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ‘रोगप्रतिकारक शक्ती’. रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी, याविषयी सगळेच संभ्रमात असतात. यातही विशेषतः शाकाहारी लोकांना कायम याचा विचार करावा लागतो. त्यामुळे आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या 5 शाकाहारी घटकांची माहिती जाणून घेणार आहोत.null

1) थंड शुध्द खोबरेल तेल

खोबरेल तेल रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात खूप मदत करते. शुध्द नैसर्गिक खोबरेल तेल अनेक व्याधींवर गुणकारी ठरते. नारळाच्या तेलात मोनोलोरीन असते, जे शरीरातील अपायकारक जीवाणू नष्ट करण्यास मदत करते. यासह वजन कमी करण्यासाठी देखील खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे.

2) आले

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आले अत्यंत फायदेशीर आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवते. याशिवाय सर्दी आणि खोकल्यातदेखील आले खूप फायदेशीर ठरते. आल्यामुळे स्नायूंना आराम मिळतो.

हळद

काळी मिरीप्रमाणेच हळद देखील एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे. हळदीत अँटी-इंफ्लेमेटरी घटक आहेत. जर आपल्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल, तर हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरते. यामुळे पडश्यात आराम पडतो.

कलौंजी

काळ्या तीळाप्रमाणे दिसणारा कलौंजी हा मसाल्यातील घटक रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यातदेखील खूप मदत करतो. यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत.

Leave a Comment